मनपाजवळ विटा फेकून मारणा:या चार जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: January 5, 2017 23:30 IST2017-01-05T23:30:03+5:302017-01-05T23:30:03+5:30
धुळे : अतिक्रमण हटाव प्रकरण

मनपाजवळ विटा फेकून मारणा:या चार जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : रस्त्याने जाणा:या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विटा फेकून मारल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुरुवारी दुपारी मनपाशेजारील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्रावर हा प्रकार घडला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
महापालिकेशेजारील कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुद्देशीय शैक्षणिक संस्था व सांस्कृतिक मंडळाचे डॉ़बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे बांधकाम काढण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी मनपाच्या अतिक्रमण निमरूलन पथकाने केला़ मात्र या वेळी गुलाब पटाईत, राहुल नारायण ढिवरे, बबन गायकवाड व कांबळे (पूर्ण नाव माहीत नाही) या चौघांनी केंद्राच्या पुढील भागाच्या काढण्यात आलेल्या बांधकामाच्या विटा रस्त्याने येणा:या-जाणा:या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने फेकून मारल्या, अशी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आखाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 336, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुन्ह्याचा तपास पो़ह़ेकॉ. बडगुजर करीत आहेत़