बांधकाम विभाग, तहसीलदार यांच्यावर गुन्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:09 IST2017-01-13T00:09:15+5:302017-01-13T00:09:15+5:30
मनपा: नदीपात्रात बेकायदा वृक्षतोडीची तक्रार, वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत आज निर्णय

बांधकाम विभाग, तहसीलदार यांच्यावर गुन्हा?
धुळे : शहरातील पांझरा नदीपात्रात सव्रेक्षणाच्या नावाखाली बेकायदेशिर वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार मनपा वृक्ष प्राधिकरण समितीला प्राप्त झाली आह़े त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीच्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणा:या सभेत निर्णय घेतला जाणार आह़े
शहरातील पांझरा नदीपात्रात सव्रेक्षणाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर तहसीलदार यांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदेशिर वृक्षतोड केल्याची तक्रार सचिन सोनवणे यांनी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीकडे केली होती़ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व शहर तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून नदीपात्रात प्रस्तावित रस्त्याचे काम थांबविण्याची मागणीही करण्यात आली होती़ त्यानुसार मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या त्रिसदस्यीय समितीने प्रत्यक्ष पाहणी केली असता हत्तीडोह परिसरात आठ ते दहा झाडांची तोड झाल्याचे दिसून आल़े त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला वृक्ष समितीने नोटीस बजावित वृक्षतोडीबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे सूचित केले होत़े मात्र बांधकाम विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही़ त्यामुळे अखेर सोनवणे यांचा तक्रार अर्ज आयुक्तांच्या आदेशाने वृक्ष प्राधिकरण समितीसमोर सादर केला जाणार आह़े सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व शहर तहसीलदार यांच्यावर बेकायदा वृक्षतोडीबाबत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आह़े त्याचप्रमाणे पांझरा नदीपात्रात दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेपाच किमीचे रस्ते आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून प्रस्तावित करण्यात आले असून सदर कामे रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याने पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ सभेत तब्बल 30 विषयांवर चर्चा होणार आह़े