नागरीक संशोधन बिलविरुध्द भाकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 22:46 IST2019-12-19T22:46:04+5:302019-12-19T22:46:20+5:30
अनेकांनी नोंदविला सहभाग

नागरीक संशोधन बिलविरुध्द भाकपची निदर्शने
धुळे : केंद्र सरकारने नागरीक संशोधन कायदा अंमलात आणला़ परंतु, नागरीक संशोधन बिल हे भारतीय संविधानाच्या विरुध्द असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने गुरुवारी निदर्शने करण्यात आली़ विरोधही नोंदविण्यात आला़
भारतीय गणतंत्र, धर्मनिरपेक्षता आणि लोकतंत्र समाप्त करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न होत आहे़ त्याला डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी प्रखरपणे विरोध दर्शविलेला आहे़ त्याचा निषेध म्हणून देशातील डाव्या विचारसरणीच्या व समविचारी संघटनांच्यावतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने १९ डिसेंबर हा दिवस देशभर विरोध दिन म्हणून पाळण्यात येत आहे़ नागरीक संशोधन कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा़ अन्यथा, आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हिरालाल परदेशी, हिरालाल सापे, पोपटराव चौधरी, एल़ आऱ राव, एस़ यू़ तायडे, इम्रान शेख आदींनी दिला़