महानगरात कोविड सेंटर सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:27+5:302021-03-18T04:36:27+5:30
कोरोनाबाधितांवर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सध्या बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने हिरे महाविद्यालयातील कोविड सेंटर पूर्ण ...

महानगरात कोविड सेंटर सुरू करावे
कोरोनाबाधितांवर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सध्या बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने हिरे महाविद्यालयातील कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने गैरसाेय होत आहे. प्रशासनाने यापूर्वी शहरातील जिल्हा रुग्णालय व मनपाने कोविड सेंटर सुरू केले होते. त्या पद्धतीने पुन्हा येथील कोविड सेंटर सुरू करण्यात यावे तसेच या कोविड सेंटरमध्ये औषध व सलाईन साठा, आवश्यक ते डाॅक्टर्स, नर्स आदी सुविधांसह सुरू करण्यात यावे. या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने या ठिकाणी ऑक्सिजन सुविधाही उपलब्ध करून द्यावी, ग्रामीण भागातूनदेखील रुग्ण शहरात येत असल्याने शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक अमीन पटेल, आसीफ मन्सुरी, इनाम सिद्दिकी आदींनी केली आहे.