स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने अस्वच्छतेमुळे भाडणे कोविड सेंटर बंद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:32 IST2021-03-14T04:32:00+5:302021-03-14T04:32:00+5:30
गेल्या काही दिवसांपासून साक्री शहरासह ग्रामीण भागात कोरोना रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, परंतु त्यांच्यावर उपचार करण्याची ...

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने अस्वच्छतेमुळे भाडणे कोविड सेंटर बंद...
गेल्या काही दिवसांपासून साक्री शहरासह ग्रामीण भागात कोरोना रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, परंतु त्यांच्यावर उपचार करण्याची शासकीय सुविधा मात्र उपलब्ध नाही. कोरोना वाढू नये, म्हणून शासनस्तरावर कडक निर्बंध लावण्याची घाई झाली आहे, त्याच्यावर उपचार करा, घाबरू नका, असा प्रचारही करण्यात येत आहे.
परंतु उपचार करण्याची कोणतीही सुविधा तालुक्यात उपलब्ध नाही, आजूबाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणी करून, तेथील रुग्णांना कोविड सेंटर भाडणे येथे पाठविण्यात येत आहे. तेथे वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टर उपलब्ध आहेत, परंतु तेथे स्वच्छता नसल्याने रुग्णांना परत पाठविण्यात येत आहे.
कोविड सेंटर स्वच्छतेचा ठेका समाज कल्याण विभागातर्फे क्रिस्टल या कंपनीला देण्यात आलेला असल्याचेही समजले आहे. या कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांचा पगारच अदा न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यावरून कोविड रुग्णांबाबत शासन स्तरावर किती अनागोंदी कारभार सुरू आहे, हे दिसून आले आहे.