सोशल मीडियावर नगरसेवक सक्रिय, महापौर निवडीच्या राजकीय हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST2021-09-16T04:45:06+5:302021-09-16T04:45:06+5:30
महापौरपदासाठी शुक्रवारी महापालिकेत निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे. याला आता दोन दिवस ...

सोशल मीडियावर नगरसेवक सक्रिय, महापौर निवडीच्या राजकीय हालचालींना वेग
महापौरपदासाठी शुक्रवारी महापालिकेत निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे. याला आता दोन दिवस शिल्लक राहिले आहे. भाजपचे सर्व नगरसेवक हे शनिवारपासून दमण येथील हाॅटेल्समध्ये मुक्कामी आहे. दररोज तेथून वेगवेगळ्या बातम्या येत आहे. नगरसेवकांमध्ये हाणामारी झाल्यापर्यंतच्या बातम्या आल्या आहेत. सहा नगरसेवक हे धुळ्यात आल्याचीही चर्चा होती. परंतु तसे काहीच झाले नाही, असे भाजपातर्फे सांगण्यात येत आहे. काही नगरसेवकांनी पत्रक काढून भाजपचाच महापौर बसेल असा दावादेखील केला आहे. मात्र भाजपचे नाराज नगरसेवक हे वेगवेगळ्या प्रकाराने आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.
खंडपीठाच्या याचिकेकडे लक्ष-
दरम्यान, ओबीसीच्या जागेवर निवडून आलेल्या २० नगरसेवकांना मतदानाचा हक्क देऊ नका व त्यांचे सदस्यत्व रद्द या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका ही सुद्धा भाजपच्याच एका नगरसेवकाच्या समर्थकानेच दाखल केली आहे. त्यामुळे त्यासंदर्भात काही निर्णय लागतो याकडे लक्ष लागून होते.
तुम साथ हो जब अपने ...
n बुधवारी भाजपातील महापौरपदासाठी आग्रही असलेले नाराज नगरसेवक संजय पाटील यांनी आपल्या फेसबुकवर आपल्यासोबतच नगरसेवक शीतल नवले यांचा फोटो टाकला असून त्यात म्हटले आहे की, तुमची साथ असेल तर आपण दुनियाला दाखवून देऊ अशाप्रकारचे हिंदी चित्रपटातील गाने टाकून एकप्रकारे आपली मनशाच जाहीर केली आहे. ही पोस्ट दिवसभरात अनेकांनी लाइक सुद्धा केली आहे.