लळींग घाटात कापसाचा ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 15:44 IST2019-01-10T15:44:36+5:302019-01-10T15:44:52+5:30
शॉर्टसर्किट : २१ टन कापसाचे नुकसान

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटाजवळ कापसाने भरलेल्या ट्रकला अचाणक शॉर्टसर्किटमुळे आग लागली़ याआगीत सुमारे २१ टक कापसासह ट्रक जळुन खाक झाला़ लळींग घाटाजवळ काल बुधवारी साडेबारावाजेच्या सुमारास भुसावल येथुन २१ टन कापुस घेऊन जाणाऱ्या ट्रक एमपी़४६ एच़०९६१ हा ट्रक इचलकरंजी येथे जात असतांना अचानक ट्रकने स्टेअरिंग व्हील जॅम झाल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन घसरला़ यात ट्रकच्या कॅबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली़ यावेळी ट्रक चालक शाहरूख खान माजीद खान रा़बडवानी मध्यप्रदेश याने कॅबिनबाहेर उडी घेतल्याने तो बचावला़ दरम्यान याआगीत ट्रकसह २१ टन कापुस जळुन खाक झाला आहे़ याबाबत मनपा प्रशासनाला माहीती मिळताचं अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते़ याबाबत मोहाडी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़