वडजाई येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीची झाडे उपटून नेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST2021-08-26T04:38:45+5:302021-08-26T04:38:45+5:30
वडजाई येथील शेतकरी विजय भटा देवरे हे एका शेतकऱ्याची शेती भाडेतत्त्वावर करीत आहेत. त्यांची शेती धुळे रस्त्यावर अनवर नाल्याजवळ ...

वडजाई येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीची झाडे उपटून नेली
वडजाई येथील शेतकरी विजय भटा देवरे हे एका शेतकऱ्याची शेती भाडेतत्त्वावर करीत आहेत. त्यांची शेती धुळे रस्त्यावर अनवर नाल्याजवळ आहे. त्यात त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे व कोरडवाहू शेती असल्यामुळे कपाशीला वेळोवेळी पाणी कमी मिळाल्यामुळे पिकाची वाढ खुंटली. त्यात उत्पन्नात मोठी घट येणार आहे. त्यात अजून चोरांची भर पडली आहे. धुळ्याकडून दोन तरुण मोटारसायकलीवर येतात, शेतात कुणीही नाही असे पाहून शेतातील कपाशीची झाडे तोडून वाहनावर झाडे ठेवून पसार होतात. गेल्या चार- पाच दिवसांपासून दररोज झाडे तोडून नेत असून, आतापर्यंत शंभर ते सव्वाशे झाडे तोडून नेली आहेत. यावर्षी निसर्गाने पोटावर मारलेच आहे; परंतु चोरटेही आता जिवावर उठले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार असून, पोलिसांनी चोरट्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.