मनपाचे बांधकाम कचरा संकलन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:05+5:302021-03-18T04:36:05+5:30
शासनाच्या घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील वरखेडी रोडवरील मधूबापु माळी जलकुंभालगत बांधकाम आणि पाडकाम कचरा संकलन केंद्र कार्यान्वित केले आहे. ...

मनपाचे बांधकाम कचरा संकलन केंद्र
शासनाच्या घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत शहरातील वरखेडी रोडवरील मधूबापु माळी जलकुंभालगत बांधकाम आणि पाडकाम कचरा संकलन केंद्र कार्यान्वित केले आहे. त्यामुळे नागरिकांना जुने बांधकाम पाडल्यावर किंवा बांधकाम चालू असल्यावर काँक्रीट, माती, लोखंड, लाकूड, विटांचे तुकडे आदी साहित्य निघते. शासनाच्या आदेशानुसार बांधकाम आणि पाडकाम कचरा नियमानुसार या साहित्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कचरा निर्मात्यांची आहे. परंतु, बहुतांश वेळा हे साहित्य संबंधितांमार्फत शहरातील रस्त्यावर टाकले जाते. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे कचरा व साहित्य संकलन करण्यासाठी मनपा वरखेडी रोडवर बांधकाम आणि कचरा संकलन केंद्र सुरू केले आहे.
शहरातील नागरिक, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक यांनी सदर संकलन केंद्रात स्वखर्चाने बांधकाम साहित्य टाकावे अन्यथा जे बांधकाम पाडले त्याचे साहित्य शहरातील रस्त्यावर टाकल्यास त्यांच्याविरूध्द महापालिकेमार्फत दंडात्मक कारवाई येईल, अशी माहिती मनपाकडून देण्यात आली.