एसआरपीच्या वसाहतीमधील सात महिलांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 22:33 IST2020-05-12T19:42:33+5:302020-05-12T22:33:14+5:30
पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ६२ वर

dhule
धुळे - धुळे जिल्ह्यात आणखी सात रूग्ण पॉजीटीव्ह आढळले आहेत. पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. एसआरपीएफच्या जवानांच्या संपकार्तील सात महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बाधीत महिला जवानांच्या कुटुंबातील असल्याची माहिती मिळते आहे.
बाधितांना मालेगाव हस्ट्री- मालेगाव येथे डयुटी करुन परतलेल्या बाधित एसआरपी जवानांच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी काही जणांचे अहवाल अद्याप बाकी आहे.
पोस्ट कार्यालयातील कर्मचारी सेल्फ क्वारंटाईन -
येथील पोस्ट आॅफीस मधील अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. या गोष्टीचा धसका घेत पोस्ट आॅफीस मधील कर्मचाºयांनी १४ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील १४ दिवस सेल्फ क्वारंटाईन होणार असल्याचे पत्र त्यांनी महानगर पालिकेच्या अधिकाºयांना दिले आहे.दरम्यान मनपाकडून कार्यालय निर्जतुकीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले़