शिरपुरात ‘कोरोनामुक्त शहर’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:29 IST2020-07-19T22:29:19+5:302020-07-19T22:29:32+5:30
संडे अँकर । सामाजिक संघटनांतर्फे घरोघरी मोफत आरोग्य काढाचे केले जातेय वाटप

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील जनकल्याण पतसंस्था व सहकार भारतीच्यावतीने तहसीलदार आबा महाजन यांचे हस्ते मोफत आयुष्य काढा वाटप करून शहरात कोरोना मुक्त अभियान विविध संघटनांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शहरातील वरचे गाव परिसरात जनकल्याण पतसंस्था व सहकार भारती शिरपूर यांच्या माध्यमातून कोरोना आजारा संदर्भात जनजागृती व मोफत आयुष्य काढाचे वाटप तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सुर्यकांत पाटील व डॉ.आशीष अग्रवाल यांनी कोरोना आजारांवर महत्त्वपुर्ण मार्गदर्शन केले. यावेळी आयुष्य काढाची १५० पाकिटे वाटप करण्यात आले़ या परिसरातील प्रत्येक घरात काढा देण्याचे जनकल्याण पतसंस्था व सहकार भारती यांनी ठरविले आहे.
यावेळी जनकल्याण पतसंस्थेचे संचालक दिलीप चौधरी, सुनील बारी, उत्तर महाराष्ट्र प्रांत संघटन प्रमुख सहकार भारतीचे दिलीप लोहार, शशीकांत चौधरी उपस्थित होते़ कार्यक्रमात उपस्थितांनी मास्क लावून सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे केले होते. शहरातील आवश्यक त्या भागात व काही आदिवासी वस्तीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ या कार्यक्रमाला शिरपूर मर्चंट बँकेचे संचालक महेश लोहार, लोहार समाज मंडळाचे संतोष लोहार, बालाजी पतसंस्थेचे संचालक सुभाष लोहार, जय मल्हार मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी, दादा गणपती मंडळाचे सचिव सुनील चौधरी, न्यु दादा गणपती मंडळाचे पदाधिकारी, जनकल्याण पतसंस्था कर्मचारी व या परिसरातील बंधु-भगिनी उपस्थित होते.