हृदयरोग, ॲलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायला हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST2021-03-10T04:36:02+5:302021-03-10T04:36:02+5:30
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. आता दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ ...

हृदयरोग, ॲलर्जी असली तरी कोरोना लस घ्यायला हवी
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. आता दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ६० वयोगटातील सह व्याधिग्रस्त व इतर गंभीर आजार असलेल्यांना लस देण्यात येत आहे. शहरात तीनशे नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार ५० हेल्थ केअर वर्कर, ९ फ्रंटलाइन वर्कर, ४५ ते ६० वर्षे वयाेगटातील ६७ अशा १६७ नागरिकांना लस देण्यात आली. धुळे शहरातील खासगी रुग्णालयात १ हजार १०० नागरिकांपैकी ७१२ जणांना लस देण्यात आली. साक्री तालुक्यात ७०० पैकी १५५, शिंदखेडा तालुक्यात ८०० पैकी ७७१, शिरपूर तालुक्यात ३०० पैकी १९२ जणांना लस देण्यात आली.
थंडी-ताप आला तरी घाबरू नये...
लसीकरणानंतर थंडी, ताप किंवा हातपाय दुखणे असा त्रास होऊ शकतो. ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. त्यामुळे ताप आला तरी घाबरण्याचे कारण नाही. आजपर्यंत कोणताही गंभीर दुष्परिणाम झाल्याचे उदाहरण नाही. लसीकरणानंतर दिलेल्या गोळ्या वेळेत घ्याव्यात, असे सांगण्यात आले.