धुळ्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा अखेर शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 22:23 IST2021-01-16T22:22:50+5:302021-01-16T22:23:53+5:30
महापालिका : पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची होती उपस्थिती

धुळ्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा अखेर शुभारंभ
धुळे : कोरोना लसीकरणाच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी धुळे महानगरपालिका अंतर्गत लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
सदर मोहिमेचा शुभारंभ प्रभात नगर नागरी आरोग्य केंद्र येथे माननीय महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते आयुक्त अजित शेख उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रधानमंत्री यांच्या हस्ते आॅनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सदर लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ साडेदहा वाजता करण्यात आला़ त्यानंतर महापौर यांच्या हस्ते सदर लसीकरण सत्राची उद्घाटन करण्यात आले़ या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख डॉ.पल्लवी रवंदळे डॉ. अर्चना आगळे डॉ. संपदा कुलकर्णी डॉ. रूपाली पाटील डॉ. शिंदे सर हे उपस्थित होते. सदर लसीकरण मोहिमेअंतर्गत एका लसीकरण सत्राच्या ठिकाणी १०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे़ यामध्ये पहिल्या स्तरावरील आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांना शनिवारी लसीकरण करण्यात येणार आहे़ लसीकरण झाल्याबाबत ची नोंद संबंधित कोविन पोर्टल वरती करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी तसेच चार आरोग्य कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आलेली असून कोणत्याही लाभार्थ्याला लस दिल्यानंतर काही आरोग्यविषयक तक्रार निर्माण झाल्यास करावयाचे उपाय योजना बद्दलची किट प्रत्येक लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच त्याच्या वापराबाबत प्रशिक्षण सुद्धा कर्मचाºयांना देण्यात आलेले आहे.