कोरोना काळात 24 अधिकारी कर्मचारी जाळ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:19+5:302021-09-02T05:17:19+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आतापर्यंत साडेचार वर्षांत १४ विभागांतील ५८ जणांवर कारवाई केली. यामध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे. ...

कोरोना काळात 24 अधिकारी कर्मचारी जाळ्यात !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आतापर्यंत साडेचार वर्षांत १४ विभागांतील ५८ जणांवर कारवाई केली. यामध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिक्षण विभागाचा समावेश आहेत. पोलीस विभागातील ६, वन विभाग २, भूमी अभिलेख ६, पाटबंधारे ३, आरोग्य ४, जिल्हा परिषद ७, प्रादेशिक परिवहन ३, महावितरण ५, दारूबंदी ३, मनपा १, खाजगी विभागातील १ तर एका सरपंच आहे.
आठ क्लासवन अधिकारी जाळ्यात
२३ जुलै २०२१ रोजी तक्रारदाराकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी करणारे शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी तसेच नरडाणा वैद्यकीय अधिकारी असे दोघे क्लासवन अधिकारी लाच स्वीकारतांना आढळले होते.
३०० ते साडेचार लाखांची मागणी
१८ मार्च २०२१ रोजी केवळ तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील एक कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. तर २४ जुलै २०१९ मध्ये प्रादेशिक परिवहन विभागातील एक वरिष्ठ अधिकारी तब्बल ४ लाख ५० हजारांची लाच घेताना सापडला होता. जानेवारी २०१८ ते जुलै २०२१ कालावधीत सर्वाधिक कमी ३०० ते सर्वाधिक साडेचार लाखांची लाच स्वीकारताना दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यश मिळाले आहे.