पोलीसालाही कोरोनाची लागण, जिल्ह्यात रूग्णांची संख्या ६१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:50 IST2020-05-11T20:49:03+5:302020-05-11T20:50:11+5:30

आठही रूग्ण शहरातील कन्टेन्टमेन्ट

Corona infection in the police, the number of patients in the district is 61 | पोलीसालाही कोरोनाची लागण, जिल्ह्यात रूग्णांची संख्या ६१ वर

dhule

धुळे- हिरे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी सोमवारी रात्री ४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील एका ३५ वर्षीय कर्मचाऱ्याचाही सहभाग आहे. पॉझिटिव्ह आलेले रूग्ण शहरातील कन्टेन्टमेन्ट झोनमधील आहेत. दरम्यान शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ५१ झालेली आहे. तर जिल्ह्याची संख्या ६१ झालेली आहे. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून, १८ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे.

Web Title: Corona infection in the police, the number of patients in the district is 61

टॅग्स :Dhuleधुळे