‘कोरोना’ चा पोल्ट्री व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 15:39 IST2020-03-18T15:39:15+5:302020-03-18T15:39:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : बोराडी परीसरात शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय केलेला आहेस, मात्र कोरोना हा आजार ...

'Corona' hits the poultry business | ‘कोरोना’ चा पोल्ट्री व्यवसायाला फटका

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : बोराडी परीसरात शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय केलेला आहेस, मात्र कोरोना हा आजार पोल्ट्रीमुळे होत असल्याच्या अफवेने येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
पशुसंवर्धन विभागामार्फत येथील शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत पोल्ट्री व्यवसायासाठी लाखोंचे अनुदान मिळाले होते. काही शेतकºयांनी ोजनेअंतर्गत शेतकºयांना जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय सुरु केला होता. काही शेतकºयांनी बॅकेकडुन लाखोंचे कर्ज घेत पोल्ट्री व्यवसाय उभारला होता. तसेच कोंबड्यांना खाद्यपदार्थ म्हणून प्रामुख्याने मक्याला प्राधान्य दिले जाते. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर मका पिकांचे नुकसान झाल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते़ पुन्हा आता परत कोरोना रोगांमुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना हा आजार कोंबड्यापासून पसरत असल्याच्या सोशन मीडीयाच्या अफवेने या शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान कोंबड्यास दर न मिळाल्याने विक्रीस मोठ्या प्रमाणात घट झाल्याने त्यांची विल्हेवाट करावी लागत आहे़ त्यामुळे अनेक पोल्ट्री शेड रिकामी झाली आहे़

Web Title: 'Corona' hits the poultry business

टॅग्स :Dhuleधुळे