कोरोनाचा दुग्ध व्यवसायावर फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:02 IST2020-04-07T22:01:46+5:302020-04-07T22:02:25+5:30
दरात घसरण : दुधापासून तयार केलेल्या वस्तू बनविण्याकडे प्राधान्य,सोशल डिस्टंस ठेवत विक्री

dhule
धुळे : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना दूध उद्योगांवरही त्याचा परिणाम होत असून जिल्हा दूध संघातून होणारी दुधाची विक्री तब्बल २० ते ३० हजार लिटरने घटली आहे़ दुसरीकडे मात्र, दूध डेअरीवर पनीरला मागणी वाढल्याचे चित्र आहे.
जगासह देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात संचारबंदी लागू केली आहे़ किराणा दुकान, दूध डेअरी तसेच मेडिकल, पेट्रोल पंप यासह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहेत़ संचारबंदी असताना सुध्दा जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक दुकाने तसेच दूध डेअरींवर गर्दी करीत आहे़ जाते़ दिवसाला तीन ते सव्वा तीन लाख लिटर दूध संकलित केले जाते़ दूध उत्पादने व पिशवी बंद दूध तयार करून त्यांची बुथवर विक्री सुरु आहे.
रात्री ९ वाजेनंतर डेअरी बंद
कोरोनाचा फटका, दूध विक्री घटली देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव हा राज्यात दिसून आला़ याचा फटका दूध उत्पादकांनाही बसला़ सध्या २० ते ३० टक्कयांनी दूध विक्री घट झाली आहे़ दही, ताक, लस्सी याचीही विक्री कमी झाली आहे़ कोरोनामुळे रात्री ९ वाजेनंतर डेअरी बंद ठेवण्यात येतात़
देवपूर व अन्य परिसरात दुध घेतांना नागरिकांकडून सोशल डिस्टंस पालन केले जात आहे़ त्यासाठी नागरिकांना देखील दुध विक्रेत्याकडून जनजागृती केली जात आहे़