कोरोना काळात १८ रुग्णांना केली साडेचार लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST2021-06-26T04:25:06+5:302021-06-26T04:25:06+5:30
श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाकडून किडनी, कॅन्सर, मेंदू विकार, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, लिव्हरचे प्रत्यारोपण, डायलेसीस, हेपेटायटीस, ...

कोरोना काळात १८ रुग्णांना केली साडेचार लाखांची मदत
श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाकडून किडनी, कॅन्सर, मेंदू विकार, हृदय शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, लिव्हरचे प्रत्यारोपण, डायलेसीस, हेपेटायटीस, कर्करोगावरील उपचार, थायलेसिमिया, खुब्याचे गुडघ्याचे, मज्जातंतूची शस्त्रक्रिया या आजारांवरील उपचारांसाठी प्रति रुग्ण किमान २५,००० हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाते, तसेच जन्मजात कर्णबधिर मुलांना १ लाख रुपयांची मदत केली जाते.
कोरोना महामारीतही सिद्धिविनायक न्यासातर्फे वैद्यकीय मदत अखंडपणे सुरू आहे. गेल्या काही दिवसांत १८ रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी २० ते २५ हजारांपर्यंत अशी एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा निधींचे धनादेश मंजूर झाला होतो. त्यापैकी काही रुग्णांच्या नातेवाइकांना सिद्धिविनायक मंदिरातून देण्यात आले, तर काहींना भगवा चौकातील शिवसेना कार्यालयात युवासेना जिल्हाप्रमुख अॅड.पंकज गोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
मदतीसाठी संपर्क साधावा
श्री सिद्धिविनायक वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी रुग्णांना कोणताही खर्च येत नाही. समावेश असलेल्या आजारापैकी काेणाला मदत लागल्यास रुग्णांनी व नातेवाइकांनी शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे संपर्क साधावा, तसेच श्री सिद्धिविनायक गणपती न्यास वैद्यकीय मदतीच्या नावाने कोणीही पैसे मागितल्यास तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा.
अशी मिळते मदत
श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे मदत मिळावी, यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलेली आहे. रुग्णांनी आपली सविस्तर माहिती भरल्यानंतर तातडीने काही दिवसांत मदत केली जाते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ऑफलाइन अर्ज व मूळ-कागदपत्र शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे जमा केल्यानंतर सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिर वैद्यकीय कक्षात जमा केले जातात.