धुळे - येथील जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रूग्णांनी कोरोनावार मात केली आहे. रविवारी त्यांना रूग्णालयातून निरोप देण्यात आला. कोरोनावर विजय मिळविलेल्या रूग्णामध्ये एक पोलीस कर्मचारी व एका टपाल कार्यालयातील कर्मचाºयाचा समावेश आहे.धुळे पोलीस दलातील एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली होती. मागील दहा दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी पोलीस कर्मचाºयाला रूग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचा?्याच्या स्वागतासाठी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत व सहाय्यक पोलीस अधिक्षक उपस्थित होते. तसेच पोलीस दलाच्या बण्ड पथकाने वाद्य वाजवून आपल्या कोरोनावर मात करून रूग्णालयाबाहेर पडत असलेल्या सहकाºयाचे स्वागत केले. जिल्हा रूग्णालयात कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग झाला आहे मात्र कोणतेही लक्षणे नाहीत असे बहुतांश रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. रूग्णालयात दाखल असणाºया रूग्णांना कंटाळवाणे वाटू नये त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी जिल्हा रूग्णालयातील कोरोना कक्षात दोन दुरचित्रवाणी संच लावण्यात आले होते. आणखी दोन दुरचित्रवाणी संच भेट देणार असल्याचे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाºयाच्या स्वागताप्रसंगी सांगितले. आतापर्यत जिल्ह्यातील ११२ रूग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. त्यात जिल्हा रूग्णालयातून १० रूग्णांचा समावेश आहे़ कोरोनाच्या लढ्यातील योगदानाबद्दल जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील व जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी सत्कार केला.