कोरोनामुळे दहावी-बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:24+5:302021-03-18T04:36:24+5:30
धुळे : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदादेखील घटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात २८ ...

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !
धुळे : कोरोनाच्या संसर्गात होत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदादेखील घटण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात २८ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु, त्यापैकी केवळ २७ हजार ९२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कोरोनासह इतर कारणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत. २१ हजार ५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. बारावीला २४ हजार ५८ विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु, प्रत्यक्षात २३ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१ हजार ८४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यंदादेखील ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा संसर्ग राज्यभर वाढला आहे. धुळ्यातही रुग्णांची संख्या विक्रमी पटीने वाढत आहे. विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता आहे.
येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नोंदणीसाठी अजून मुदत आहे. विद्यार्थी अर्ज भरत आहेत. त्यामुळे यंदा किती विद्यार्थी परीक्षा देतील हा आकडा आजच सांगणे कठीण आहे. कारण परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच शिक्षण मंडळाकडून परीक्षार्थ्यांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाते. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला नेमके किती विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत हे आताच सांगणे कठीण आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
नियमित विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण झाल्यामुळे अनेक विद्यार्थी कोरोना आणि लाॅकडाऊनमध्ये कुटुंबाला मदतीसाठी धावल्याने शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर आहेत. पुन्हा काेरोनाचे संकट ओढवले असून, लाॅकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या घटणार आहे. अजून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमकी आकडेवारी हाती आली नाही.