मानवी साखळीद्वारे कोरोना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:09 IST2021-03-28T21:09:13+5:302021-03-28T21:09:39+5:30

धुळे :  परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, सुगावा प्रकाशनाचे तत्त्वनिष्ठ प्रकाशक व संपादक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक विलास वाघ यांना अनोखी ...

Corona awareness through the human chain | मानवी साखळीद्वारे कोरोना जनजागृती

मानवी साखळीद्वारे कोरोना जनजागृती

धुळे :  परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, सुगावा प्रकाशनाचे तत्त्वनिष्ठ प्रकाशक व संपादक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक विलास वाघ यांना अनोखी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
विलास वाघ यांचे पुणे येथे कोरना आजारामुळे नुकतेच निधन झाले. नवनिर्मिती संस्था धुळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील क्षेत्रकार्य विद्यार्थ्यांच्या वतीने धुळे शहरातील संतोषी माता चौक, बस स्टँड, गांधी पुतळा, धुळे महानगरपालिका या ठिकाणी कोरोना या आजाराविषयीची जाणीव जागृती करण्यात आली. नवनिर्मिती संस्थेच्या पथकाने प्रबोधनात्मक बॅनर हातात घेऊन मानवी साखळी तयार केली. नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे यांनी गर्दीच्या ठिकाणी जात असताना तोंडाला मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर इतर वस्तूंना हात लावल्यानंतर तो हात नाकाला, तोंडाला डोळ्याला वारंवार लावण्याचे टाळा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा, घाबरून जाऊ नका पण जागरूक राहा, मीच माझा रक्षक, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी व्हा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे नागरिकांना आवाहन केले. या उपक्रमात नवनिर्मितीस संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे प्रा. राहुल आहेर, प्रकल्प समन्वयक निलेश पगारे, सुनिता पगार, नेतल जाधव, वैभव जगदेव, खुशाल साळुंके, नितीन साबळे , राजेंद्र खैरनार, प्रमोद शिरसाट उपस्थित होते. या उपक्रमाला कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर तहसीलदार धुळे शहर सुचिता चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Corona awareness through the human chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे