रोहन येथे कोरोना जनजागृती व आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST2021-05-31T04:26:25+5:302021-05-31T04:26:25+5:30

रोहन ग्रामपंचायत अंतर्गत रोहन व ढवळीविहीर ही गावे समाविष्ट आहेत. या गावांतील संपूर्ण नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी पथक तयार करून ...

Corona Awareness and Health Checkup at Rohan | रोहन येथे कोरोना जनजागृती व आरोग्य तपासणी

रोहन येथे कोरोना जनजागृती व आरोग्य तपासणी

रोहन ग्रामपंचायत अंतर्गत रोहन व ढवळीविहीर ही गावे समाविष्ट आहेत. या गावांतील संपूर्ण नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी पथक तयार करून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी सूर्यवंशी व भाग विस्तार अधिकारी महाले, नोडल अधिकारी बेहेरे, संपर्क अधिकारी, केंद्रप्रमुख गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विकास साळुंखे, विमल चौरे, नीता निकाळजे, अंगणवाडी सेविका निर्मला बहिरम, संगीता गायकवाड, आशा सेविका सुनीता गायकवाड, सीताबाई भदाणे, आरोग्य सेवक संजय महाले, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश बहिरम, कोकणी सरपंच अनिता बागुल, उपसरपंच शंकर पवार, पोलीसपाटील कन्हैया पवार, भाऊसाहेब बागुल, तलाठी छाया राऊत व ग्रामसेवक हेमंत सोनार यांनी याकामी परिश्रम घेतले.

यावेळी गावात मस्क लावणे, हात धुणे व सामाजिक अंतर ठेवणे, शंभर टक्के लसीकरण करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Corona Awareness and Health Checkup at Rohan