कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या ...! आता मुंबई, पुण्यात नसलेल्या मुलांनाही पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:43 IST2021-09-04T04:43:06+5:302021-09-04T04:43:06+5:30
मागील काही वर्षांपासून वधू व वराकडील नातेवाईक व पालकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वधू-वर सूचक मंडळाचे सदस्य सांगतात. मुलगा ...

कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या ...! आता मुंबई, पुण्यात नसलेल्या मुलांनाही पसंती
मागील काही वर्षांपासून वधू व वराकडील नातेवाईक व पालकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वधू-वर सूचक मंडळाचे सदस्य सांगतात. मुलगा हा मोठ्या शहरातच नोकरीला असावा, ही त्यापैकीच एक मुख्य अपेक्षा आहे; पण कोरोनाच्या काळात त्यात काहीसा बदल झाला आहे. आता लहान शहरात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या मुलांनाही पसंती वाढली आहे, तसेच कोरोनाच्या काळात घटस्फोटित नियोजित वधूला स्वीकारलेल्या वरांचीही संख्या मोठी आहे. काही वरांनी तर घटस्फोटित नियोजित वधूच्या अपत्यांसह स्वीकारले असल्याची माहिती मिळाली.
वधू - वर सूचक मंडळ चालक म्हणतात ...
कोरोनाकाळात मुले व मुलाच्या पालकांच्या अपेक्षा काही प्रमाणात बदलल्या आहेत. काही अपेक्षा अजूनही कायम आहेत. कोरोनामुळे विवाह नोंदणीवर परिणाम झाला असून, मंडळाकडे विवाहासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
- बी.टी. देवरे,
मराठा सेवा संघ वधू - वर मंडळ
या अपेक्षांची पडली भर
- जवळच्या शहरात असणाऱ्या मुलांनादेखील पसंती मिळू लागली आहे.
- मुलगा व मुलगी दोन्हीही नोकरी करणारे असावे, असा आग्रह वाढला आहे.
या अपेक्षा झाल्या कमी
- मुलगा मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरातच नोकरी करणारा असावा, अशी अपेक्षा मुलीच्या पालकांची असायची.
- आता कोरोनामुळे काही प्रमाणात लहान शहरातल्या मुलांनाही पसंती मिळत आहे.
- घटस्फोटीत मुलीलाही स्वीकारणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती मिळाली.