लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 13:41 IST2020-07-24T13:40:58+5:302020-07-24T13:41:39+5:30
शिरपूर : तालुक्यात आतपर्यंत फक्त ३९ टक्के पाऊस, शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हर फ्लो

लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : श्रावण महिना सुरू झाला, पावसाळ्याचे तब्बल दोन महिने लोटून सुध्दा बहुतांशी धरणे अद्यापही कोरडी आहेत़ मात्र काही शिरपूर पॅटर्न अंतर्गत बांधण्यात आलेले धरणे ओव्हर फ्लो वाहतांना दिसत आहे़ दरम्यान, तापी नदी दुथडी वाहत आहे़ तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरण आतापर्यंत ६३ टक्के पाण्याने भरले गेले आहे़
शहरासह तालुक्यात गेल्या ५ दिवसापासून पावसाने दांडी मारली आहे़ दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे नदी-नाले वाहते झाले होते़ मात्र त्यानंतर पुन्हा ते कोरडे झालेत़ सांगवी मंडळात व सीमा हद्दीवर जोराचा पाऊस होत असल्यामुळे रोहिणी, खंबाळे, आंबे परिसरातील शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हर फ्लो होवून वाहत आहेत़
गेल्या जून मध्ये १३४ मिमि पाऊस झाला आहे़ जुलै महिन्याच्या २२ तारखेपर्यंत ११९ मिमि असा एकूण २५३ मिमि पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ या २२ दिवसात फक्त ६ रोजी ४९ मिमि, ७ ला १८, ११ ला १, १६ ला १७ तर १७ रोजी ३२ मिमि पाऊस पडला आहे़ सरासरीच्या एकूण फक्त या दोन महिन्यात ३९ टक्के पाऊस झाला आहे़ असे असतांनाही बहुतांशी परिसरात पिके चांगली बहरलेली दिसतात़ शिरपूर पॅटर्न बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाºयाचा अधिक फायदा होत असल्यामुळे त्या भागातील पिके अधिक जोमाने वाढली आहेत़
२२ रोजी मंडळनिहाय झालेला पाऊस व कंसात आतापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर मंडळात ० (२५३), थाळनेर ६ (३४९), होळनांथे ० (२०५), अर्थे ४ (२९०), जवखेडा ७ (२१८), बोराडी ० (३३४), सांगवी ० (३७०) मिमि असा पाऊस झालेला आहे़ सर्वात कमी होळनांथे मंडळात तर सर्वाधिक पाऊस सांगवी मंडळात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे़
करवंद येथील मध्यम प्रकल्पात आतापर्यंत ६२़८१ टक्के तर अनेर मध्यम प्रकल्पात २८़७८ टक्के पाण्याचा साठा आहे़ सद्यस्थितीत अनेर धरणाचे काही दरवाजे खुले असल्यामुळे पाणी अडविण्यात येत नाही़ शासकीय नियमानुसार १५ आॅगस्ट रोजी अनेर धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर पाणी अडविले जाते़