जिल्ह्यात ११८ स्थलांतरीत नागरीकांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 09:56 PM2020-04-01T21:56:01+5:302020-04-01T21:56:22+5:30

प्रशासकीय उपाययोजना : विविध ठिकाणी सुरू केले २२ कॅम्प, प्रशासनाने केली अन्न, निवाऱ्यासह औषधोपचाराची सुविधा

Convenience of 3 migrants in the district | जिल्ह्यात ११८ स्थलांतरीत नागरीकांची सोय

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थलांतरीत कामगार, बेघर नागरीक आणि परराज्यात गेलेल्या प्रवाशांना रस्त्यातच रोखले जात आहे़ प्रशासनातर्फे धुळे जिल्ह्यात २२ ठिकाणी कॅम्प उभारण्यात आले असून त्यात या नागरीकांची राहण्याची, जेवणाची आणि औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे़ धुळे जिल्ह्यातही लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंद, साथरोग प्रतिबंधक अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा यांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे़ जिल्हाबंदी, राज्यबंदी करुन प्रवास बंद करण्यात आला आहे़ जीवनावश्यक वस्तुंची वाहने वगळता सर्व वाहने बंद केली आहेत़ नाकाबंदी करुन रस्ते सील केले आहेत़
दरम्यान, रोजगारानिमित्त इतर राज्यात किंवा महानगरांमध्ये गेलेले नागरीक कुटूंबासोबत परत येत आहेत़ वाहने मिळत नसल्याने त्यांचा पायी प्रवास सुरू आहे़ काहींनी मिळेल त्या वाहनाने शक्य होईल तिथपर्यंतचे अंतर कापण्याचा निर्णय घेतला आहे़ काहींनी तर नियमबाह्यपणे गाड्या करुन प्रवास सुरू केला आहे़ अशा प्रवाशांना राज्य आणि जिल्हा सिमेवर रोखले जात आहे़
इतर राज्यातून किंवा इतर शहरांमधून आलेल्या नागरीकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे अशा स्थलांतरीत प्रवाशांना रस्त्यातच रोखले जात आहे़
अशा स्थलांतरीत कामगार, बेघर नागरीक, परराज्यात गेलेल्या प्रवाशांसाठी धुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कॅम्प उभारण्यात आले आहेत़ या कॅम्पमध्ये विलगीकरण कक्ष तयार करुन या नागरीकांची राहाण्याची सोय करण्यात आली आहे़ याठिकाणी त्यांना जेवण आणि औषधोपचार देखील दिला जात आहे़ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कोरोना तपासणी केली जात आहे़ त्यांच्या हातांवर क्वारंटाईनचा शिक्का मारुन एकाच ठिकाणी एकटे राहण्याच्या सूचना केल्या आहेत़
दरम्यान, स्थलांतरीत नागरीकांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत़ वैद्यकीय अधिकाºय्यांनी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार करावे. जिल्हा रुग्णालयामध्ये संशयित कोविड-१९ कक्षामध्ये या सर्वांना दाखल करावे आणि त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घ्यावा. चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास त्वरीत आयसोलेशन कक्षात दाखल करावे. अहवाल नकारात्मक आल्यास महसुल विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढील कार्यवाही करावी.
पिंपळनेरला चार ठिकाणी सोय
स्थलांतरीत मजूर, प्रवासी व इतर व्यक्ती यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था, भोजन, कपडे, वैद्यकीय सेवा पुरविण्या कामी येथील अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी चार आस्थापना ताब्यात घेतले आहेत़ त्यात लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय, दमंडकेश्वर लॉन्स, महावीर भवन, साई इंद्रप्रस्थ लॉज यांचा समावेश आहे़ याठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत़
११८ स्थलांतरीत २२ पेक्षा अधिक कॅम्प
स्थलांतरीत नागरीकांसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी २२ कॅम्प उभारण्यात आले आहेत़ त्यात साक्री तालुक्यात २४, पिंपळनेर येथे सर्वाधिक ५२, शिंदखेडा येथे २७ तर धुळे शहरात १५ स्थलांतरीत कामगारांना, प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ या कॅम्पमध्ये सर्वांची राहण्याची, जेवणाची आणि औषधोपचाराची प्रशासनाने मोफत सोय केली आहे़ स्थलांतरीत नागरीकांचा आकडा वाढू शकतो़

Web Title: Convenience of 3 migrants in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे