क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 22:03 IST2021-03-27T22:02:49+5:302021-03-27T22:03:04+5:30

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा गाैरव

Contributing to the prevention of tuberculosis | क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात योगदान

क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात योगदान

धुळे : जीत फाऊंडेशन नवी दिल्ली आणि धुळे महानगरपालिका क्षयरोग केंद्रातर्फे असोसिएशन ऑफ फिजिशियन यांचा सन्मानचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला. 
क्षयरोग अर्थात टीबीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. क्षयरुग्णांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी क्षयरुग्णांची नोंद शासनाच्या निक्षय पोर्टल व महापालिकेकडे कळविणे बंधनकारक केले आहे. 
शहरातील खासगी रुग्णालय यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती देण्याबाबत शहर क्षयरोग केंद्रामार्फत वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. 
सन २०२० मध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित केले होते. याबाबतीत असोसिएशन ऑफ फिजिशियन धुळे संघटनेने तसेच सर्व डाॅक्टरांनी क्षयरुग्णांची माहिती आरोग्य विभागाला देण्यासाठी उत्कृष्ट सहकार्य केले. 
संघटनेचे सचिव डाॅ. संदीप भावसार यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन संघटनेच्या कार्याचा गाैरव केला. खासगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यापुढे देखील आरोग्य विभागाला सहकार्य करेल आणि क्षयरोग उच्चाटनासाठी सक्रिय सहभाग नोंदवेल, अशी ग्वाही डाॅ. भावसार यांनी दिली. 
यावेळी क्षयरोग अधिकारी डाॅ. जे. सी. पाटील, डीपीएस शशिकांत कुवर, पीपीएम समन्वयक प्रीती कुलकर्णी, जीत फाऊंडेशनचे अधिकारी मनोहर दुसाणे आदी उपस्थित होते.
कमी वयाच्या तरुणांमध्ये देखील क्षयरोगाचे रुग्ण आढळून आल्याची उदाहरणे आहेत.

Web Title: Contributing to the prevention of tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे