शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसामुळे कपाशीची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:00 IST

धुळे जिल्हा : मूग, उडीदचे नुकसान, कपाशीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता, शेतात वाफ होण्याची नितांत गरज

 धुळे : यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात खरीपाची पेरणी १०० टक्के झाली आहे. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे त्याचा विपरीत परिणाम खरीपाच्या पिकांवर होऊ लागला आहे. अतिपावसामुळे शेतात वाफ होऊ शकत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर होऊ लागला आहे. वाफ होत नसल्याने, कपाशीची वाढ काही प्रमाणात खुंटलेली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून धुळे जिल्ह्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहे. अपेक्षित पाऊस नसल्याने, त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होत होता. तीन वर्षात १०० टक्के खरिपाची पेरणीच होऊ शकली नव्हती. यावर्षी परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. जून महिना वगळता जुलै ते सप्टेंबर दरम्यान सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच खरिपाची १०० टक्के पेरणी झाली. दमदार पावसामुळे पिकांची वाढही चांगल्या प्रकारे झाली. मात्र सततच्या पाण्यामुळे उडीद-मूगाला काही प्रमाणात फटका बसला आहे. यावर्षी एकही नत्रक्ष विना पावसाचे गेलेले नाही. दररोज पावसाची हजेरी लागतच आहे. सूर्यदर्शनही दुर्लभ झालेले आहे. अति पावसाचा मात्र आता विपरित परिणाम होऊ लागला आहे. शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीची जिल्ह्यात तब्बल २ लाख २४ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. कपाशीच्या उत्पन्नावर शेतकºयांचे सर्व आर्थिक नियोजन अवलंबून असते. पावसामुळे कपाशीची उगवण चांगल्या प्रकारे झालेली आहे. झाडांना फुलही लागली आहे. भाद्रपद महिन्यात कडकं उन्ह पडतात, त्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होत असते. परंतु यावर्षी भाद्रपदातही दमदार पाऊस होत असून, अभावानेच कडक उन्ह पडते आहे. उन्हाअभावी शेतात वाफ होत नसल्याने, कपाशीची वाढ खुंटू लागली आहे. ऐन कैरी भरण्याच्या कालावधीतच कपाशी पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ लागल्याने, त्याचा फटका उत्पन्नावर बसण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी व कडक उन्ह पडावे अशी प्रार्थना करण्याची वेळ बळीराजावर येऊन ठेपलेली आहे. ज्वारी, बाजरीवरही परिणाम सतत पडणाºया पावसाचा खरीपातील ज्वारी व बाजरी या पिकांवरही काहीसा परिणाम होऊ शकतो. हा कालावधी बाजरीचे दाणे भरण्याचा आहे. यासाठी कडक उन्हाची गरज आहे. मात्र रोज ढगाळ वातावरण, अधूनमधून पाऊस पडत असल्याने, त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होऊ शकतो. अर्थात बाजरी काढणीला अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी बाकी आहे. येत्या काळात पाऊस थांबला तरी बाजरीचे उत्पन्न चांगले येऊ शकते. तीच स्थिती ज्वारीची देखील आहे.

टॅग्स :Dhuleधुळे