दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:32+5:302021-03-25T04:34:32+5:30
कोरोनाची साथ चालू असतानाच अवकाळी पावसामुळे गावात वातावरण दूषित व घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून मच्छर व मोकाट डुकरांमुळे ...

दूषित पाणीपुरवठा
कोरोनाची साथ चालू असतानाच अवकाळी पावसामुळे गावात वातावरण दूषित व घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून मच्छर व मोकाट डुकरांमुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच गावातील अनेक भागांत, दुर्गा माता परिसरात सांडपाण्याची गटारे उघडी असल्या कारणाने तिथेही तीच परिस्थिती आहे. ग्रामपंचायतीने तातडीने टीसीएल पावडर उपलब्ध करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त डाॅ. सतीश बोढरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत यांनी केली आहे. तरी याची दखल त्वरित ग्रामपंचायत प्रशासनाने घ्यावी. नेर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. परंतु प्रत्येक विभागात अतिरिक्त चार्ज देऊन कर्मचारी दिले जात आहेत. गावाला पूर्ण वेळेचे कर्मचारी का देऊ नयेत? ग्रामसेवक, तलाठी नागरिकांना वेळेवर मिळत नाहीत. ना त्यांचे कुठले वार ठरलेले, ना वेळ. त्यांना वाटेल त्या वेळेस ते हजर होतात त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत.