दूषित पाणीप्रश्नी मोगलाईतील महिलांचा मनपावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:53 IST2018-03-21T17:53:18+5:302018-03-21T17:53:18+5:30
शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी, महापौरांना निवेदन सादर

दूषित पाणीप्रश्नी मोगलाईतील महिलांचा मनपावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील साक्रीरोडवरील मोगलाई भागात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यांसंदर्भात परिसरातील महिलांनी मनपावर मोर्चा काढला़ महापौर कल्पना महाले यांना निवेदन देऊन शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली़
शहरातील विविध भागात गेल्या २० ते २५ दिवसांपासून दूषित व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे़ साक्रीरोडवरील मोगलाई परिसर, गवळीवाडा, देशमुखवाडा, लक्ष्मीनगर, चंपाबाग, जगदीशनगर, विकास कॉलनी, शनीनगर, मिशन कंपाऊंड, कुमारनगर, गणेश कॉलनी, भोईवाडा, महाले नगर, फुले नगर या भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ त्यामुळे स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करण्याचे आदेशित करावे, या मागणीसाठी मोगलाई परिसरातील महिलांनी मनपात मोर्चा आणला़ महापौर कल्पना महाले यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी महिलांनी पिवळसर पायावेळी किरण कुलेवार, हेमलता मासेवार, जयश्री चहाकर, ज्योती खरात, कल्पना जाधव, सिमा वाघ, सुशिला कुंटे, बायमा सैय्यद, कल्याणी कोळी, सोनाली आगलावे, कमल आगलावे, विमल पवार, उषा शितोळे, भारती शितोळे, जयश्री पाटील, आशा येवलेकर, अर्चना पगारे, लता पवार, साधना लिंगाडे, करूणा सुर्यवंशी, मंदाकिनी गवळी, पुनम विभुते, सारीका पवार, छाया जाधव, सरोज पानपाटील व महिला उपस्थित होत्या़