इंधन दरवाढी विरोधात कॉँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:30 IST2020-06-29T21:29:42+5:302020-06-29T21:30:02+5:30
धुळे जिल्हा : केंद्र सरकारविरोधात केली घोषणाबाजी, अनेकांची उपस्थिती

इंधन दरवाढी विरोधात कॉँग्रेसचे धरणे
धुळे : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अगोदरच जनता होरपळून निघालेली असतांना त्यात इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर शासनाने कमी करावेत या मागणीसाठी कॉँग्रेसतर्फे आज ठिकठिकाणी आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात केलेल्या घोषणेमुळे परिसर दणाणून गेला होता. धुळ्यात कॉँग्रेसच्य आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री रोहीदास पाटील यांनी केले होते. दरम्यान प्रशासनामार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले.
धुळे
इंधन दरवाढीविरोधात कॉग्रेसतर्फे आज सकाळी ११ वाजता क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले आहेत. उद्योग व्यवसाय अजुनही पूर्वपदावर आलेले नाहीत. अशा कठीण परिस्थितीत पेट्रोल-डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट नागरिकांसमोर उभे ठाकले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करतांना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ होत आहे. ७ जून २०२० पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. आतापर्यंत पेट्रोलमध्ये ९ रूपये १२ पैसे, तर डिझेलमध्ये ११ रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे. आंतरराष्टÑीय पातळीवर कच्या तेलाचे दर नीच्चांकी पातळीवर असतांना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. आंतरराष्टÑीय बाजारातील कच्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सामान्य जनतेला लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात माजी मंत्री रोहीदास पाटील यांच्यासह आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, महिला कॉँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, मनपा विरोधीपक्षनेते साबीर शेख, जिल्हा सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, भिका पाटील, मुकुंद कोळवले, प्रा. दिलीप शिंदे, माजी सभापती शांताराम राजपूत, युवक कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, राजीव पाटील, तालुकाध्यक्ष पंकज चव्हाण, गोपाल अन्सारी, वसीम सरदार, अशफाक शेख, प्रा. मुकेश पाटील, कापडणे सरपंच भटू पाटील, श्रीकांत माळी, योगेश मासुळे, राजीव पाटील, निर्मला पाटील, सुमन मराठे, भावना गिरासे, शिवाजी अहिरे, भानुदास पाटील, मका पाटील, दिनकर ठाकरे, जितेंद्र राजपूत, नरोत्तम मिरचंदानी,आदी उपस्थित होते.
साक्री
येथेही कॉँग्रेस पक्षातर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष भानुदान गांगुर्डे, पंचायत समिती सभापती प्रतिमा सूर्यवंशी, जि.प. सदस्य धीरज डी.अहिरे, विश्वास बागूल, शहराध्यक्ष प्रज्योत देसले, प्रवीण चौरे, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, सचिन सोनवणे, सचिन सूर्यवंशी, धुडकू भारूडे, गणेश गावीत, पंकज सूर्यवंशी, युवराज चौरे, प्रा. संजय बच्छाव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
शिरपूरला निवेदन दिले
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिरपूर शहर व तालुका कॉँग्रेसतर्फे आज नायब तहसीलदार यांच्यामार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले. यात इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.शहरात ३१ (१) कलम लागू असल्याने फक्त चौघांनी निवेदन दिले. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, शहराध्यक्ष उत्तमराव माळी, उपाध्यक्ष अभिमन भोई, मोहन पाटील आदी उपस्थित होते.
शिंदखेड्यात ट्रॅक्टर ढकलत केले अनोखे आंदोलन
शिंदखेडा :इंधन दरवाढीविरोधात येथेही कॉँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आली. येथील विरदेल चौफुलीवरुन शेतकºयाचे ट्रॅक्टर ढकलत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला.
शिवाजी चौफुलीवर तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी निवेदन दिले. देशात कोरोनामुळे जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ सुरू केली आहे. क्रूड आॅइलचे बाजारभाव कमी असताना जास्त दराने डिझेल पेट्रोल विक्री केली जात आहे केंद्र सरकारने तातडीने एक्साईज ड्युटी कमी करून डिझेल व पेट्रोलच्या दरवाढ कमी करावी अशी मागणी केली.
यावेळी तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, डॉ.जे.पी.बोरसे, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, हेमराज पाटील, प्रकाश पाटील, उदय देसले, कुलदिप निकम, पांडुरंग माळी, आबा मुंडे, प्रशांत बागुल, दिनेश माळी, राजेंद्र देवरे, रामकृष्ण धनगर, समद शेख, पावभा कोळी, नरेंद्र पाटील, खंडु भदाणे, भाऊसाहेब निळे, भाईदास पाटील, शहानाभाऊ पाटील, हिम्मत पवार,विशाल पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते