कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांचे धुळ्यात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:06 IST2019-03-01T16:03:23+5:302019-03-01T16:06:11+5:30

एसएसव्हीपीएस मैदानावर होत आहे सभा

 Congress national president Rahul Gandhi's arrival in Dhunda | कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांचे धुळ्यात आगमन

कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांचे धुळ्यात आगमन

ठळक मुद्देराहूल गांधींचे दुपारी ३.३० वाजता आगमनराहूल गांधींचे दुपारी ३.३० वाजता आगमन

आॅनलाइन लोकमत
धुळे- कॉँग्रसेचे राष्टÑीय अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी यांचे आज दुपारी ३.३० मिनीटांनी धुळ्यात आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीत सभेला सुरूवात झालेली आहे. व्यासपीठावर महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, आमदार अमरिश पटेल, कुणाल पाटील आदी उपस्थित आहेत खासदार राहूल गांधी यांची शहरातील एसएसव्हीपीएस मैदानावर सभा होत आहे.
राहूल गांधी यांचे गोंदूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून ते सभास्थळी रवाना झाले. सभेच्या सुरवातीला पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राहूल गांधी यांच्या सभेसाठी धुळे शहरासह धुळे ग्रामीण, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झालेले आहेत.

 

Web Title:  Congress national president Rahul Gandhi's arrival in Dhunda

टॅग्स :Dhuleधुळे