७० लाखांच्या निधीतून वडजाईरोड काँक्रिटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:45+5:302021-01-23T04:36:45+5:30
वडजाईरोड काँक्रिटीरण व गटारी मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. या रस्त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे ...

७० लाखांच्या निधीतून वडजाईरोड काँक्रिटीकरण
वडजाईरोड काँक्रिटीरण व गटारी मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. या रस्त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागत होते. मागील काही आठवड्यांपूर्वी आमदार फारूक शाह यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून पाहणी करत नागरिकांना प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार स्थानिक विकास निधीतून वडजाईरोड डांबरीकरण आणि सहारा हॉस्पिटल ते मिल्लतनगर कॉर्नरपर्यंत काँक्रिट गटारचे काम ७० लाखांच्या निधीतून या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्यासह माजी आमदार वारीस पठाण, एम.आय.एम. पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, नगरसेवक डॉ. खालिद परवेज, कुणाल खरात, रफत हुसेन, युसूफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, डॉ. दीपश्री नाईक, महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, युवा जिल्हाध्यक्ष, वसीम अक्रम, सेहबाज शाह, नझर खान, शहराध्यक्ष सऊद आलम, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष हालीम अन्सारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.