लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने प्रवाशी बस वाहतूक बंद केली तर चालक- वाहक यांची हजेरी लावायचा नियम आहे. परंतु कोरोना महासंकटात महामंडळ प्रशासन हे सोयिस्करपणे विसरल्याचे दिसत आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या आपत्तीत महामंडळाने चालक-वाहकांना सक्तीच्या २० दिवस रजेवर जाण्याचा फतवा जारी केला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा फटका बसणार असणार असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. हा फतवा मागे घेण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, एस.टी. महामंडळाने मार्च महिन्यापासून प्रवाशी वाहतूक बंद केली आहे. मध्यंतरी वाहतूक पुन्हा सुरू केली. परंतु त्यास अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा प्रवाशी वाहतूक बंद झाली. महामंडळाचे वाढते नुकसान बघता दोंडाईचा आगाराने माल वाहतूक सुरू केलीआहे. दोंडाईचा आगारात ५९ बसेस असून चालक-वाहक २२९ आहेत.चालक-वाहक यांना वषार्तून ४० दिवस रजा घेता येतात. त्यात २० दिवस मंदिच्या दिवसात तर उरलेल्या २० सुट्या गरजेनुसार घेता येतात. नैसर्गिकआपत्ती, संचारबंदी, सार्वजनीक आंदोलन काळात प्रशासनाने वाहतूक बंद केली तर चालक-वाहक यांचा पगार कापू नये,असे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते.कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून यात चालक-वाहक यांना मंदिच्या नावाखाली २० दिवस सक्तीच्या रजेवर पाठविणे, अन्यायकारक असल्याचे चालक-वाहकांसह कर्मचारी यांचे मत आहे. आगारात अगोदरच चालक-वाहक यांची संख्या कमी असून गर्दीच्या काळात गरज असतानाही सुटी मिळत नसल्याची तक्रार आहे. आता गरज नसताना नाहक सक्तीचा रजेवर पाठविले जात असल्याने दोडाईचा सह जिल्यातील चालक-वाहक यांचात असंतोष निर्माण झाला आहे. दोंडाईचा आगारातील ३०६ कर्मचाºयांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या अगोदरच महामंडळाने जून महिन्याच्या ५० टक्के पगार कापला आहे.सक्तीचा रजेचा फतवा रद्द करावा,अशी मागणी सर्वच कर्मचाºयांनी महामंडळाकडे केली आहे.अन्यायकारण निर्णय : चत्रेकोरोनामुळे बसेस बंद असल्याने मंडळाने अगोदरच जून महिन्याचा ५० टक्के पगार कापला आहे. कर्मचाºयांनी २० दिवस सक्तीचा रजेवर जाण्याचा मंडळाचा निर्णय अन्यायकारक आहे.कर्मचारी कामानिमित्त रजा घेता. २० दिवस सक्तीची रजा घेतली, तर आगामी काळात रजा मिळणार नाही. रजा शिल्लक नसल्याने बिनपगारी रजा गणली जाईल.पगार मिळणार नाही ,मग उदरनिर्वाह कसा करावयाचा हा प्रश्न आहे.महामंडळाने सक्तीचा रजेचा निर्णय रद्द करावा अशी मागणी इंटक युनियनचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे यांनी व्यक्त केली आहे.
सक्तीच्या रजेचा कर्मचाऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:19 IST