आयटीआयत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST2021-08-25T04:40:49+5:302021-08-25T04:40:49+5:30
धुळ्यात शासकीय आयटीआयच्या १०२० जागा असून, त्यासाठी आतापर्यंत २९९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यावर्षी दहावीला चांगले गुण मिळालेले आहे. ...

आयटीआयत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद
धुळ्यात शासकीय आयटीआयच्या १०२० जागा असून, त्यासाठी आतापर्यंत २९९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
यावर्षी दहावीला चांगले गुण मिळालेले आहे. त्यामुळे तंत्रनिकेतनला प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे. भविष्यात अभियंता बनायचे आहे.
- शुभम पवार,
विद्यार्थी
आयटीआय करण्याची इच्छा होती. मात्र, दहावीत अपेक्षेपेक्षा जास्त टक्के मिळाले. त्यामुळे आता बारावी सायन्सला प्रवेश घेण्याचे ठरविले आहे.
- अरुण पाटील
विद्यार्थी
आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ॲानलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. नोंदणी करण्याची मुदत ३१ ॲागस्टपर्यंत आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्राचार्य जैन
शासकीय आयटीआय,धुळे
गतवर्षापेक्षा कमी प्रतिसाद
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी दहावीचा अंतर्गत मूल्यमापनावर निकाल लागल्याने, विद्यार्थ्यांना भरमसाठ गुण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश घेण्याचा कल बदलला आहे.
आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणारेही आता सायन्स घेत आहेत तर काहीजण डिप्लोमाला ॲडमिशन घेत आहे. त्याचा परिणाम आयटीआयच्या प्रवेशावर होत आहे.