महापौरांनी सोडविल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:05 IST2020-06-17T22:04:40+5:302020-06-17T22:05:17+5:30

महापालिकेचा उपक्रम : काही भागात नियमित पाणीपुरवठा होत असल्याचे समाधान

Complaints resolved by the mayor | महापौरांनी सोडविल्या तक्रारी

dhule

धुळे : कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये़ तसेच प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मंगळवारपासून महापौर आपल्या दारी या उपक्रमास सुरुवात केली. त्याअंगर्तत मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रभाग क्रंमाक १५ मध्ये गेले. यावेळी अनेकांनी महापौर सोनार यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला़ त्यातील काही समस्या महापौरांनी तातडीने सोडविल्या.
शहरात सद्यस्थितीत निश्चीत केलेल्या पाणीपुरवठ्या नियोजन व वेळा पत्रकानुसार पाणी वितरण व्यवस्था सुरू आहे़ तथापि काही भागात पाणी वितरणात अडचणी निर्माण होत असल्याने व पाणी वितरणातील दिवस कमी करण्यासाठी महापौर चंद्रकांत सोनार यांनी मंगळवारी प्रभाग १५ मधील अशोक नगर जलकुंभ, कुमारनगर जलकुंभ, अशोक नगर, कृष्णकमल सोसायटी, उत्कर्ष कॉलनी, वसुंधरा नगर, महाविर कॉलनी, बाहूबली नगर, सत्यसाईबाबा कॉलनी आदी दिवसभर पाहणी करून माहिती घेतली़ मोगलाई, महालेनगर, फुले नगर येथील येथील पाईप लाईन जोडणीच्या कामाची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्यात.
साक्रीरोडवरील कुमारनगर भागात पाच दिवसाआड वेळापत्रकाप्रमाणे पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केल़े़
महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्र्रथम पाणी सोडण्यात येणाºया ठिकाणापासून ते वितरण वाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यत असणाºया भागात समक्ष फिरून नागरिकांशी संवाद साधला़ पाणी वितरणाची परिस्थिती त्यांच्याकडून जाणून घेतली़
ज्या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो़ त्या भागात काय उपाय-योजना करता येईल याची घटनास्थळी जावून शहनिशा करून अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले़ तसेच लिकेजेस, पाणी विरणाची वेळ याबाबत माहिती घेतली.
या उपक्रमात महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक संजय जाधव, नगरसेविका योगिता बागुल, आरोग्य अधिकारी डॉ़ महेश मोरे, ओव्हरसियर सी़एम़ उगले़ निनाद पाटील, स्विय सहाय्यक बाळू मंगीडकर आदी उपस्थित होते़

Web Title: Complaints resolved by the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे