मोफत तांदूळ प्रकरणी तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:23 IST2020-05-26T18:23:13+5:302020-05-26T18:23:35+5:30
रिपाई : सुतारे येथील स्वस्त धान्य दुकानावर कारवाईची मागणी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील सुतारे येथील स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळाचे पुरेशा प्रमाणात वाटप केले नसल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या आठवले गटाने केली आहे़
यासंदर्भात रिपाईचे जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, जिल्हा महासचिव राजु शिरसाठ, जिल्हा उपाध्यक्ष प्रेम अहिरे, धुळे जिल्हा सरचिटणीस मुकूंद शिरसाठी आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून ही तक्रार केली आहे़
निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यातील सुतारे येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक २१० मधून ताईबाई शांताराम पाडवी यांनी प्रति युनीट पाच किलो प्रमाणे मोफत तांदूळाचे वाटप न करता कमी प्रमाणा तांदूळ दिल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी पक्षाकडे केल्या आहेत़
गावातील लाभार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर अपर तहसिलदारांनी १८ एप्रिल रोजी सुतारे गावाला भेट दिली होती़ गावातील वीस लाभार्थ्यांना कमी तांदूळ मिळाल्याचे जबाब तलाठ्यांनी नोंदविले आहेत़
लॉकडाउनमध्ये गरजूंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मोफत तांदूळ उपलब्ध करुन दिला असताना कोट्याप्रमाणे धान्य वितरीत केलेले नाही़ त्यामुळे सुतारे येथील दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे़