जि.प.च्या माजी उपाध्यक्षांविरुद्ध विनयभंगाची तक्रार

By Admin | Updated: January 18, 2017 00:06 IST2017-01-18T00:06:56+5:302017-01-18T00:06:56+5:30

थाळनेर : संशयितांमध्ये संबंधित पीडित महिलेच्या वडिलांचाही समावेश

Complaint against the former vice-president of ZP | जि.प.च्या माजी उपाध्यक्षांविरुद्ध विनयभंगाची तक्रार

जि.प.च्या माजी उपाध्यक्षांविरुद्ध विनयभंगाची तक्रार


थाळनेर : पिंप्राळा (जि. जळगाव) येथील महिलेने आपल्या वडिलांसह  धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कांतिलाल दगा (के.डी.) पाटील यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी विनयभंग केल्याची तक्रार थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल केली आह़े 
ही 32 वर्षीय महिला  10 जानेवारीला दुपारी 12 वाजता चोपडा तालुक्यातील वडोदा येथे शाळेचा दाखला घेण्यासाठी आपल्या पतीसह जात होती. त्यावेळी ते होळनांथे-बभळाज रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गाडीची वाट पाहत थांबले होते.
या वेळी मोटारसायकलवरून महिलेचे वडील पांडुरंग भगीरथ गुजर (पाटील)   हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल दगा (के.डी.) पाटील यांच्यासह त्या ठिकाणी आले.
त्या दोघांनी   ही महिला  व तिच्या पतीस  शिवीगाळ करीत मारहाण केली आणि विनयभंग केल्याची तक्रार सदर महिलेने मंगळवारी दुपारी थाळनेर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. त्या फिर्यादीनुसार     धुळे जि.प.चे माजी उपाध्यक्ष के.डी.पाटील, (रा.जापोरा ता.शिरपूर) व पांडुरंग भगीरथ गुजर, (रा.वडोदा ता.चोपडा) या दोघांविरुध्द मंगळवारी दुपारी भादंवि कलम 354, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत़ याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Web Title: Complaint against the former vice-president of ZP