पुरूषावरील अन्याथ थांबविण्यासाठी आयोग गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:13 IST2019-11-20T23:13:02+5:302019-11-20T23:13:33+5:30
जागतिक पुरूष दिन : जिव्हाळा अॅडव्होकेट अकॅडमी संस्थेतर्फे पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन

Dhule
धुळे : पुरुष झालेला अन्याय उघडपणे सांगत नाही, मनातल्या मनात कुढत असतो, महिलांकडून पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण वाढले आहे.त्यासाठी पुरुष आयोगाची स्थापना होणे गरजेचे असे मत जागतिक पुरूष दिनानिमित्त आयोजिक कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले़
येथील जिव्हाळा अँडव्होकेट अँकेडमीत मंगळवारी जागतिक पुरुष दिनानिमित्त चर्चासत्र घेण्यात आले़ अध्यक्षीय भाषणात डॉ. बिºहाडे यांनी प्रशासकीय सेवेतील महिला व पुरुष अन्यायाचे अनुभव कथन केले़ समारोप प्रसंगी प्रा. गोपाळ निंबाळकर यांनी अन्याय निवारण होणेसाठी समानतेवर आधारित शिक्षण व समुपदेशनाची गरज आहे़ न्यायालयात पोहचण्यापुर्वी पिडीत व संशयित यांच्यात समुपदेशन होण्याची गरज आहे़ यावेळी सरोज कदम, स्मिता खैरनार, सुरेखा नांद्रे, अॅड. शोभा खैरनार,प्रा.कल्पना भागवत, डॉ.राजेंद्र निकुंभ, तरूणा पाटील, शितल बोरसे, वर्षा माळी, नारायण गवळे, रवींद्र चव्हाण, अमित खैरनार, नवल ठाकरे, रमेश पगारे, विजय महाले, प्रा.डॉ. विनोद भागवत, लक्ष्मण दुसाणे, महादु महाले, नविनचंद्र भदाणे आदी सहभागी होते़
१९६० पासून पुरुषांच्या विकासासाठी संपूर्ण जगात हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा करण्यात येतो़ पुरुषांमधील संकुचित विचारसरणी, अनामिक भिती, न्यूनगंड भावणांनी पुरुष दिन कमी साजरा होतो़ महिलांविषयी आदर राखून, पुरूषांच्या विरोधात भूमिका न घेता पुरुषांच्या विकासात योगदान द्यावे असे अॅड़ विनोद बोरसे यांनी सांगितले़
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अॅड. गोविंद गढरी, अॅड. अबरार सैय्यद, अॅड. रामा दहिहंडे, अॅड. नगिन कुन्नुमल,अॅड. अनंत भुषण, अॅड. डी.एन. पवार, अॅड. विवेक जाधव यांनी सहकार्य केले. आभार अॅड. भामरे यांनी केले.