रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:26+5:302021-07-21T04:24:26+5:30
येथील गुरुगोविंद व्यायाम शाळापासून समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सोनगीर गटाच्या सदस्या वैशाली चौधरी यांच्या प्रयत्नाने ...

रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात
येथील गुरुगोविंद व्यायाम शाळापासून समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सोनगीर गटाच्या सदस्या वैशाली चौधरी यांच्या प्रयत्नाने हा रस्ता होत आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जि.प. सदस्या वैशाली चौधरी, सरपंच रुख्माबाई गोरख ठाकरे, ज्ञानेश्वर चौधरी, धाकू बडगुजर, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, विशाल कासार, राहुल देशमुख, आरीफ खॉ पठाण, शफियोद्दीन पठाण, मोहन सैंदाणे, समाधान पाटील, ग्रामपंचायत सदस्य लखन ठेलारी, पिंटू भिल, हाजी अल्ताफ कुरेशी, पाटील, इरफान कुरेशी, रोहित पाटील, हर्षल गुजर आदी उपस्थित होते.