जामनेरला येऊन हिशोब चुकता करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 21:59 IST2019-02-12T21:58:59+5:302019-02-12T21:59:52+5:30
आमदार अनिल गोटे : आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेला उधाण

जामनेरला येऊन हिशोब चुकता करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आमदार झालोच पाहीजे अशी काही माझी धारणा नाही़ तुमचा हिशोब चुकता करणार, भलेही मला जामनेरला येऊन थांबावे लागले तरी हरकत नाही, अशी टीका आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर केली आहे़
आमदार अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महाजनांनी काहीच कारण नसताना माझ्याशी धुळ्यातील कर्तुत्वशुन्य लोकांसाठी शत्रुत्व ओढवून घेतले़ जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणाले की अनिल गोटेंची एक सीट सुध्दा येऊ द्यायची नव्हती, याचा अर्थ असा आहे की त्यांनीच मतदान यंत्रामध्ये हेराफेरी करुन आदल्या दिवशी राष्ट्रवादीतून आलेल्यांना निवडून आणण्याचे काम केले असल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे, असा आरोपही आमदार अनिल गोटे यांनी केला आहे़