आओ जाओ घर तुम्हारा! बसस्थानक, जिल्हासीमा..कोठेच तपासणी नाही; कोरोना कसा रोखणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:38+5:302021-03-18T04:36:38+5:30
धुळे-चाळीसगाव रेल्वे तर बंदच आहे. परंतु बस सेवा मात्र सुरु आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या ...

आओ जाओ घर तुम्हारा! बसस्थानक, जिल्हासीमा..कोठेच तपासणी नाही; कोरोना कसा रोखणार ?
धुळे-चाळीसगाव रेल्वे तर बंदच आहे. परंतु बस सेवा मात्र सुरु आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरांसह इतर राज्यांतून प्रवासी बस स्थानकावर येत आहेत. याशिवाय जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांच्या सिमा आहेत. येथून देखील प्रवासी बसने किंवा खाजगी वाहनाने येत आहेत. पंरतु कोणत्याही उपाययोजना नाहीत.
गेल्या वर्षी राज्यसीमा, जिल्हासीमा सील करुन प्रवाशांची तपासणी केली जात होती. परंतु यंदान नाही.
पुणे, मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणीच नाही
इतर जिल्ह्यातून, राज्यातून प्रवासी येत आहेत. परंतु त्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नाही. त्यामुळे काॅन्टॅक्ट डिटेल्स घेतले जात नाही. एखादा प्रवासी बाधित असेल तर त्याच्या संपर्कात येणारे सर्वच जण बाधित होतील. मग कोरोनाला कसा रोखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासन पाहतय शासनाच्या सूचनांची वाट
गेल्या वर्र्षी प्रवाशांची तपासणी केल्याशिवाय त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात नव्हता. परंतु यंदा मात्र सर्वत्र आलबेल परिस्थिती आहे. शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. तत्पुर्वी प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना सुरु केल्या आहेत. परंतु प्रवाशांच्या तपासणीबाबत प्रशासन शासनाच्या सूचनांची वाट पाहत आहे.
वाढत्या संसर्गात काय उपाय योजना केल्या?
धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने रविवारी सायंकाळपासून ते बुधवारी सकाळपर्यंत तीन दिवसांचा लाॅकडाऊन केला होता. सर्व व्यवहार ठप्प होते.
कार्यालये, दुकाने, आस्थापना, हाॅटेल्स, विवाह सोहळे, अंत्यविधी, मोर्चे, आंदोलने आदींना निर्बंध घातले आहेत. परंतु प्रत्यक्षात नियम पाळले जात नाहीत.
प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले असले तरी पोलिस यंत्रणेने अजुन गांभीर्याने कारवाई सुरु केलेली नाही. तीन दिवसांच्या बंदमध्ये दुकाने बंद पण नागरिक बाहेर होते.
गरज भासली आणि शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या तर राज्यसीमा, जिल्हासीमा, बस स्थानकांवर प्रवाशांची तपासणी केली जाईल.
- दिलीप जगदाळे,
जिल्हाधिकारी