महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, संशयित तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Updated: January 17, 2024 18:20 IST2024-01-17T18:20:31+5:302024-01-17T18:20:54+5:30
पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयात एकटी जात असताना संशयित तरुण रस्त्यात उभे राहून हातवारे करायचा.

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, संशयित तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल
धुळे : तालुक्यातील एका गावात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा सप्टेंबर २०२३ ते १४ जानेवारी २४ दरम्यान वारंवार विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणाविरूद्ध सोनगीर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयात एकटी जात असताना संशयित तरुण रस्त्यात उभे राहून हातवारे करायचा. तसेच पीडितेची त्याच्याशी बोलण्याची इच्छा नसतानाही तो जबरदस्तीने बोलायचा. माझ्यासोबत चालत का नाही असे म्हणत तो तरुणीला उचलून घेऊन जाईल अशी धमकी देत होता. तसेच समाजमाध्यमावर स्टेटस ठेवून बदनामी करण्याची धमकी देत होता. या छळाला कंटाळून पीडितेने सोनगीर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.