मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर ट्रेझरीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; वार्षिक तपासणी पूर्ण : मार्चअखेरचे लेखे मुदतीत सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:20+5:302021-04-01T04:36:20+5:30

जिल्हाधिकारी यांनी बुधवारी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी त्यांचे स्वागत ...

Collector's visit to the Treasury on the backdrop of the March End; Annual inspection completed: Order to submit accounts by the end of March | मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर ट्रेझरीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; वार्षिक तपासणी पूर्ण : मार्चअखेरचे लेखे मुदतीत सादर करण्याचे आदेश

मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर ट्रेझरीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; वार्षिक तपासणी पूर्ण : मार्चअखेरचे लेखे मुदतीत सादर करण्याचे आदेश

जिल्हाधिकारी यांनी बुधवारी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा कोषागार कार्यालयाची जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वार्षिक तपासणी नुकतीच करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत लेखा परीक्षण शाखेमार्फत ही पाहणी करण्यात आली. याबाबतचे अहवाल वाचन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

अहवाल वाचनादरम्यान जिल्हाधिकारी म्हणाले, कोषागारात सादर होणारी देयके नियमानुसार तपासून त्यांचा विहित मुदतीत निपटारा करावा. धुळे जिल्ह्याचे मार्च २०२१ अखेरचे लेखे महालेखापाल कार्यालयास विहित मुदतीत सादर करावेत. तसेच कार्यालयातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फायर ऑडिट करुन त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या.

यावेळी लेखाधिकारी रतिलाल निकम, अपर कोषागार अधिकारी प्रवीण देवरे, सहायक लेखा अधिकारी गुंजाळ, उपलेखापाल आळंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Collector's visit to the Treasury on the backdrop of the March End; Annual inspection completed: Order to submit accounts by the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.