भगवान परशुराम ब्राह्मण मंडळातर्फे सामूहिक माैंज साेहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:40+5:302021-02-06T05:07:40+5:30
शहरात ब्राह्मण समाजातील बटूंच्या सामूहिक माैंजीचे आयोजन गेल्या २५ वर्षांपासून भगवान परशुराम ब्राह्मण मंडळातर्फे सातत्याने हाेत आहे. ब्राह्मण ...

भगवान परशुराम ब्राह्मण मंडळातर्फे सामूहिक माैंज साेहळा
शहरात ब्राह्मण समाजातील बटूंच्या सामूहिक माैंजीचे आयोजन गेल्या २५ वर्षांपासून भगवान परशुराम ब्राह्मण मंडळातर्फे सातत्याने हाेत आहे. ब्राह्मण समाजात माैंज संस्कार महत्त्वाचा मानला जाताे. त्यानुसार यंदा भगवान परशुराम ब्राह्मण मंडळातर्फे १६ राेजी सकाळी १०.५५ वाजता सामूहिक माैंज साेहळा हाेणार आहे. या साेहळ्यात बटूंना आशीर्वाद देण्यासाठी नारायण बुवा समाधी मंदिराचे मठाधिपती भाऊ महाराज रूद्र यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासंदर्भात नुकतीच मंडळाची बैठक झाली. त्याला शेखर कुलकर्णी, विकास देवभानकर, विजय गुरव, तुळशीराम गुरव, बाळू प्रजापत, श्रीराम कुलकर्णी, प्रमाेद भट, बबलू चाैधरी, बग्गीवाले आदी उपस्थित हाेते. माैंजीचे पाैराहित्य प्रमाेद कुलखर्णी व राेहित पानट गुरुजी यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यात यजमानास कमीत कमी आथिक बाेजा यावा, यादृष्टीने संपूर्ण साेहळ्याचे नियाेजन केले जात आहे. यासाठी ओम कुळकर्णी ह्या बटूंची प्रथम नाेंदणी करण्यात आली आहे. तरी या साेहळ्यात ज्यांना सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी नाव नाेंदणीसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन भगवान परशुराम ब्राह्मण मंडळातर्फे करण्यात आले.