शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील आग्रा रोडवर लोटगाडीवाल्यांना हटवित साहित्य जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 23:11 IST

महापालिकेची धडक मोहीम : पोलिसांची घेतली मदत, १५ ते २० जणांवर कारवाई, तणावाची परिस्थिती

धुळे : शहरातील आग्रा रोडवर अवैध पार्किंगसह लोटगाडीवाल्यांनी जागा अडवून ठेवली़ परिणामी अपघाताचा धोका वाढला होता़ वारंवार सांगूनही त्याचा उपयोग होत नसल्याने अखेर गुरुवारी सकाळी विशेष मोहीम राबविण्यात आली़ पाचकंदिल चौक ते महात्मा गांधी पुतळापर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेल्या १५ ते २० लोटगाड्यांवर कारवाई करण्यात आली़ महापालिका आणि पोलीस या दोन विभागाने ही मोहीम राबविली़ वाहतुकीच्या कोंडीसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त मालिका लावली होती़ त्याची दखल घेण्यात आली आहे़ शहरातील आग्रा रोडवर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ते चाळीसगाव रोड क्रॉसिंगवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सारखीच स्थिती होती़ बिनधास्तपणे लोटगाडी रस्त्याच्या मधोमध लावली जात होती़ पाच कंदिलच्या चौकात तर ही स्थिती दिवसभर कायम असायची़ यापुर्वी महापालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने ही अतिक्रमण हटाव मोहीम या भागात राबविण्यात आली आहे़ पण, तेवढ्यापुरता लोटगाडीवाले बाजूला सरकत होते़ पुढे कारवाई केल्यानंतर मागे पुन्हा परिस्थिती जैसे थेच होत होती़ यावर गुरुवारी पुन्हा लक्ष केंद्रीत करण्यात आले़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस    निरीक्षक दिनेश आहेर, वाहतूक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव आणि अन्य कर्मचाºयांनी गुरुवारी सकाळी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली़ या मार्गावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही अशी तंबी देत त्यांच्याकडील साहित्य जमा केले़ काही काळ तणाव निर्माण झाला होता़  शहरातील आग्रा रोडसह अन्य ठिकाणी वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहेत़ याठिकाणी अवैध पार्किंगसह बिनधास्तपणे लोटगाड्या उभ्या करुन रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला जात होता़ यामुळे अपघाताचा धोका वाढला होता़ ही बाब ‘लोकमत’ने अधोरेखित करीत वृत्त मालिकेच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ प्रशासनाने देखील ही बाब गांभिर्याने घेऊन नियोजन आखले़ त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून केली आहे़ आता ही मोहीम टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येणार असून रस्ता मोकळा केला जाणार आहे़ शहरातील आग्रा रोडवर सर्वाधिक वर्दळ असते़ सर्वांचाच वावर याच रस्त्यावर असल्यामुळे पथारीवाले, लोटगाडीवाले या ठिकाणी येऊन आपला व्यवसाय करत असतात़ त्यांनी रस्त्याच्या एका कडेला आपला व्यवसाय करणे अनिवार्य असताना मात्र रस्त्यावरच येऊन पाचकंदिल चौकात व्यवसाय करीत असल्याचे वारंवार समोर येत होते़ प्रशासनाने तडकाफडकी मोहीम राबविली खरी, पण हे काम अव्याहतपणे सुरु राहिले तर त्याचा उपयोग आहे़ नाहीतर काहीही उपयोग नाही़ 

टॅग्स :Dhuleधुळे