ऊसाचा थंडगार गोडवाही हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:39 IST2020-05-25T21:39:29+5:302020-05-25T21:39:48+5:30
लॉकडाउन : ऐन उन्हाळ्यात रसवंत्या बंद

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाउनमुळे रसवंत्या बंद असल्याने ऐन उन्हाळ्यात ऊसाचा थंडगार रसाचा गोडवाही हिरावला गेला आहे़ रसवंती व्यावसायिकही अडचणीत आले आहेत़
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळा आला की रसवंत्या नजरेस पडतात़ यंदा देखील शहरातील मुख्य रस्त्यांवर उसाच्या रसाची दुकाने थाटली होती. साक्री रोड, वाडीभोकर रोड, महानगरपालिका व जिल्हा सामान्य रुग्णालय नजीक असलेल्या रसवंतीवर नागरिकांची गर्दी होत उसळायची़ तसेच एसटी महामंडळाच्या कार्यालया शेजारी पारंपरिक पद्धतीने बैलाचा वापर करुन घाण्यावरचा ऊसाचा रस काढला जातो़ ही रसवंती धुळेकरांचे लक्ष वेधून घेते़ परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाउन केल्याने रसवंत्या देखील बंद पडल्या़