दमदार पाऊस होऊनही धरणांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST2021-09-06T04:39:47+5:302021-09-06T04:39:47+5:30

जून व जुलै या दोन महिन्यात तालुक्यात केवळ ३२ टक्के पाऊस झाला होता़ जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे ...

Cold in the dams despite heavy rains | दमदार पाऊस होऊनही धरणांमध्ये ठणठणाट

दमदार पाऊस होऊनही धरणांमध्ये ठणठणाट

जून व जुलै या दोन महिन्यात तालुक्यात केवळ ३२ टक्के पाऊस झाला होता़ जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी केली़ सुरुवातीच्या नक्षत्रातील दमदार पावसामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या़ त्यानंतर पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली़ मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमेजू लागली होती़ पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटू लागली़ शिरपूर तालुक्यातील १ लाख ४ हजार १७३ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ९९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे़ ९५़७५ टक्के खरीप पिकांची लागवड झाली आहे़

ॲागस्ट महिन्याच्या सुरवातीलाही तालुक्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले़. तशातच १७ रोजी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला, काही मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली़ दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीदेखील सलग असे ३ दिवस पाऊस झाला़ त्यामुळे कोमजलेली पिकेदेखील टवटवीत दिसू लागलीत़ मात्र पुन्हा २१ ऑगस्टनंतर पावसाने दांडी मारली़ ३० ॲागस्ट रोजी पुन्हा पाऊस झाला़ गेल्या ३ दिवसापासून शहरासह तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे़

१ सप्टेंबर रोजी झालेला पाऊस व कंसात आतापर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर ६० मिमी (४९५), थाळनेर- २७ (३१९), होळनांथे- २१ (२८४), अर्थे- ६० (३६८), जवखेडा-२० (३०६), बोराडी- ५४ (४६४), सांगवी-५७ मिमी (३८१) आतापर्यंत झाला आहे़

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या करवंद धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता १८़२६ दलघमी असताना आतापर्यंत या पावसाळ्यात १२़०१ दलघमी पाण्याचा साठा म्हणजेच ६५़७७ टक्के पाण्याने भरले आहे़ आतापर्यंत ४२५ मिमी पाऊस धरण परिसरात झाला असून गतवर्षी या दिवसाअखेर ७८१ मिमी पाऊस झाला होता़ अनेर धरणाची ४९़२७ दलघमी क्षमता असताना ३३़११ म्हणजेच ६७़२० टक्के पाण्याने भरले आहे़ गतवर्षी या धरण परिसरात ६७० मिमी पाऊस झाला असताना यावर्षी आतापर्यंत केवळ २४० मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ तसेच तालुक्यातील बहुतांशी लघु प्रकल्पातदेखील पाण्याचा ठणठणाट आहे़

Web Title: Cold in the dams despite heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.