ऑक्सिजन टँकच्या शुभारंभाला आचारसंहितेचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:25 IST2020-11-19T12:24:55+5:302020-11-19T12:25:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील आठवड्यापासून ऑक्सिजन टँक दाखल झाला आहे. बुधवारी ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील आठवड्यापासून ऑक्सिजन टँक दाखल झाला आहे. बुधवारी त्याची ट्रायल पार पडली. मात्र विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे आचारसंहिता लागली असून त्यामुळेच ऑक्सिजन टँक चा शुभारंभ लांबणीवर पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे यांनी मात्र ऑक्सिजन पुनर्भरणाची निविदा प्रक्रिया सुरु आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्सिजन टँकचा शुभारंभ होणार असल्याचे म्हटले आहे.
गुजरात राज्यातील वडोदरा येथून ऑक्सिजन टँक मागील आठवड्यातच दाखल झाला आहे.
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात १३ हजार लिटर क्षमता असलेला ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. बुधवारी त्याची ट्रायल देखील पार पडली. कुठे गळती आहे किंवा काय दुरुस्ती करावी लागेल त्याची तपासणी करण्यासाठी ट्रायल केल्याची माहिती हिरे वैधकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली.
कोरोनामुळे धुळे- नंदुरबार विधान परिषद निवडणूक स्थगित झाली होती. आता पुन्हा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली असून आचारसंहिता लागली आहे.
३ डिसेंबर रोजी मतदान व ५ डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन टँकचा शुभारंभ लांबणीवर पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.
विधान परिषदेची निवडणूक आटोपल्यानंतर शुभारंभ होण्याची चिन्हे आहेत.