सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:48 IST2019-11-18T11:47:58+5:302019-11-18T11:48:48+5:30

उपक्रम : धुळे येथील सीबीएसई स्कूलमध्ये विविध कलागुणदर्शन कार्यक्रम

Cocktails of cultural events | सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांची धमाल

dhule

शिरपूर : धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूल बालदिनाचे औचित्य ब्रिटीश कौन्सिल अंतर्गत (आय.एस.ए.) ‘फेस्टी विस्टा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर करुन धमाल उडविली.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी न्या.गायकवाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव जे.ए. शेख, महापौर चंद्रकांत सोनार, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.राजू भुजबळ, उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, तहसिलदार किशोर कदम, तहसिलदार संजय शिंदे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर चव्हाण, मुख्य सल्लागार संतोष अग्रवाल, पटेल संकुलाचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्रकल्प अभियंता ईश्वर पाटील, मुख्याध्यापिका सुनंदा मेनन, मिलिटरी स्कूलचे प्राचार्य दिनेशकुमार राणा, सीबीएसई स्कूलचे प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्य पी.सुभाष, पोदार स्कूलचे प्राचार्य भूषण उपासनी, नॉर्थ पाँइंट स्कूलचे प्राचार्य थॉमस, प्राचार्य डॉ.समीर गोयल, प्राचार्य डॉ.निलेश साळुंके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्री प्रायमरी, पहिली ते आठवीचे विद्यार्थी व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत़ विद्यार्थ्यांनी जगभरातील चीन, सौदी अरेबिया, ब्राझील, फ्रान्स, यु.एस.ए, न्युझिलंड, केनिया, भारत या आठ देशांतील वेगवेगळी वेशभूषा तसेच त्या देशांमधील प्रतिके घेऊन विद्यार्थ्यांनी नृत्य केले़ जगभरातील विविध सांस्कृतिक घडामोडींचा आढावा यांचे प्रदर्शन, चित्रीकरण करून एकतेचे दर्शन या कार्यक्रमातून शिक्षक व विद्यार्थी यांनी सादर केले.
सुरुवातीस प्रास्तविक एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांनी केले.

Web Title: Cocktails of cultural events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे