शिवजयंती कार्यक्रमात कायद्याचे पालन केल्यास सहकार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:03 PM2018-02-18T12:03:29+5:302018-02-18T12:04:10+5:30

धुळ्यात शांतता समितीची बैठक : अपर पोलीस अधीक्षक यांचा विश्वास

Co-operation with the rule of law in Shiv Jayanti! | शिवजयंती कार्यक्रमात कायद्याचे पालन केल्यास सहकार्य!

शिवजयंती कार्यक्रमात कायद्याचे पालन केल्यास सहकार्य!

Next
ठळक मुद्देशिवजयंतीच्या अनुषंगाने एलसीबीचे पथक सज्ज झाले आहे़हद्दपार केलेल्यांवर त्यांचा ‘वॉच’ राहणार आहे़त्या अनुषंगाने पथकाने नियोजन देखील केले आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांनी कायद्याचे पालन करावे़ शांततेत उत्सव साजरा करावा़ कोणत्याही प्रकारे शांतता बिघडवू देऊ नका अशा सूचना करत कायद्याचे पालन केल्यास पोलिसांकडून सहकार्य मिळेल असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी बैठकीत व्यक्त केला़ 
सोमवारी साजरी होणाºया शिवजयंतीचे औचित्य साधून शहर वाहतूक शाखेच्या शेजारी असलेल्या हॉलमध्ये शांतता समितीची बैठक शनिवारी सायंकाळी घेण्यात आली़ त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक पानसरे बोलत होते़ व्यासपिठावर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, जिल्हा विशेष शाखेचे डी़ एस़ गवळी, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, आझादनगरचे दत्ता पवार, शहर वाहतूक शाखेचे प्रकाश मुंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सरिता भांड, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळ, मोहाडी पोलीस ठाण्याचे अभिषेक पाटील या अधिकाºयांसह मनोज मोरे, रामकृष्ण खलाणे, भिकन वराडे, संजय वाल्हे, रजनीश निंबाळकर, सुमीत पवार, मनोज वाल्हे, शव्वाल अन्सारी, अमोल सूर्यवंशी, उमेश चौधरी आदी उपस्थित होते़ 
पानसरे यांनी उपस्थितांना मौलिक सुचना केल्या़ डीजे वाद्याला बंदी असल्याने कोणीही त्याचा आग्रह करु नये़ अनधिकृत विषयाबाबत परवानगी कोणीही मागू नये़ सर्वांनी कायद्याचे पालन करत शांततेत उत्सव साजरा करावा़ कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी़ वेळेचे बंधन सर्वांनी पाळणे गरजेचे राहिल़ कायद्याची चौकट कोणीही ओलांडू नये अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या़ 
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, मनोज मोरे, शव्वाल अन्सारी, रामकृष्ण खलाणे, भिकन वराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन दिलीप गांगुर्डे यांनी केले़ 

Web Title: Co-operation with the rule of law in Shiv Jayanti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.